क्रिकेट

माझी पहिली साथ क्रिकेटची बॅट,

फक्त हवी क्रिकेट खेळताना मित्रांची साथ.

कधी बॉल हरवल्यावर काड्याचं कॉन्ट्री,

कधी बॉल शोधताना व्हायची संध्याकाळची रात्री.

चिडून खेळायचो जिंकण्यासाठी,

आता वेळच मिळत नाही खेळण्यासाठी.

टीम टुर्नामेंटमध्ये टाकताना करायचो माज,

टीम हरल्यावर वाटायची लाज.

डमी फी भरताना फुटायचं घाम,

अरे मित्रा, लास्ट मॅच आहे, आता तरी थांब.

मैदान दिसलं की दिसतो फक्त बॅट, बॉल आणि क्रिकेट,

रडू नको मित्रा, अजून वेळ आहे, कारण पडला नाही तुझा विकेट.

मैदान असो १८० डिग्री किंवा ३६० डिग्री,

पण पार्टनरशिपला असावा मित्र आपला जिगरी.

                                                      -आयुष ज्ञानेश्वर ठाकुर


Comments

Most Liked

दोस्त

मेरे लिए जीवन

चहा