माझी clarinet

  माझी clarinet

Clarinet :अरे.. किरण... आज सकाळी मला निक्षिप्त पडलेल्या अवस्थेत तसाच सोडून गेलास,

आणि म्हणत होतास मी तुज्यावर जीवापाड प्रेम करतो

किरण: अग... वेडे... तूझ माझ्यावर निखळ आणि निस्वार्थी प्रेम आहे यात काही तीळ मात्र शंका नाही.

अग... वेडे... तुला सकाळी जेव्हा मी निक्षिप्त  पडलेल्या अवस्थेत पाहिलं ना,

खर तर मला तेव्हा राहवलं नाही,मला रडताना पाहुन तुलाही दुःख होईल म्हणून मी बाहेर जाऊन अक्षरक्षा डोळ्यातून अश्रू ढाळत रडलो.मला अशा अवस्थेत तुलाही पाहवल नसत.

तुझं माझं प्रेम म्हणजे जवळ जवळ 11 ते 12 वर्षांचं.

अग... वेडे.. तूच तर सरगम मधलं पहिला 'सा' सूराचा ज्ञान मला दिलंस, आता तर तू शेवटच्या 'धं' सुरपर्यंत बिनदास बोलत होतीस. तुझ्या सुरांचा गोडवा जणू मधा सारखा सर्वांना मंत्रमुग्ध करणारा होता.

तुझं आणि माझं प्रेम खरं तर न विसारण्यासारख आहे.

तुला माहीत आहे का आज सकाळ पासून माझं चित्त ठिकाणावर नाही आहे शिवाय मला आज दिवसभर मानसिक त्रास झाला आहे

I hope so तू पुन्हा बरी होशील आणि मला पुन्हा साथ देण्यासाठी परत उभी राहशील.

                                                                                                                      -Kiran Mhatre


Comments

Most Liked

दोस्त

मेरे लिए जीवन

चहा